संपादक-२००९ - लेख सूची

पत्रसंवाद

प्रसन्न दाभोलकर, सातारा आ.सु.च्या २००९ च्या अंकात श्री. कृ.अ.शारंगपाणी यांनी माझ्या लेखाबाबत दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांचे उत्तर – १) ‘माझ्या लेखात “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.” हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म’ असे वाक्य आहे. ‘हेही कळले नाही.’ असे श्री. शारंगपाणी लिहितात. माझी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. श्री. …

सकारात्मक दृष्टीतून इतिहासलेखन

इतिहास लिहिण्याच्या पद्धतींमागच्या भूमिकांचा आढावा घेणारा रा.ह.तुपकरींचा लेख या अंकात आहे. त्यांच्या आगामी ग्रंथातील इतिहास या प्रकरणाचा तो संक्षेप आहे. इतिहासकार व त्याचा वर्तमानकाळ यांचा त्याने लिहिलेल्या इतिहासावर परिणाम होणारच. पण व्यक्तिसापेक्षता मान्य करूनही ते कल्पकतेतून लावलेला अर्थ आणि बुद्धिपुरस्सर केलेली मोडतोड…… (यांतील) सीमारेषा फार पुसट असतात, असा महत्त्वाचा इशारा देतात. कथाकथनात्मक, मार्क्सवादी, आधुनिकतावादी व …

पत्रसंवाद

पत्रसंवाद मोरेश्वर वडलकोंडावार, मूल-४४१२२४ (मोबाईल – ९४२१८७८००५) अर्थशास्त्र्यांनी गरिबीत गाडलेल्यांचाही अभ्यास करावा! ‘मारक खाजगीकरण’ या शीर्षकाने इंडियन एक्सप्रेस/प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यातील एका बातमीकडे लक्ष वेधण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रापिकल मेडिसिन या संस्थांनी सोवियत युनियनची छकले व पूर्व युरोपातील इतर देश अशा पंचवीस देशांचा नव्वदच्या दशकातील मृत्युदराचा अभ्यास …

संपादकीय नवे गडी, नवा राज!

आजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा …

पत्रसंवाद

पत्रसंवाद कृ.अ.शारंगपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४. पूर्वी साहित्यिक विश्राम बेडेकरांच्या ‘सिलिसबर्गची पत्रे’ या पुस्तकात ‘ब्रहा म्हणजे सीमातीत केवळ जागृती’ असे वाक्य वाचले होते. परंतु ते काय सांगत आहेत, हे कळले नव्हते. आता आपल्या ऑगस्टच्या अंकात प्रसन्न देवदत्त दाभोलकर “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.’ हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म, असे …

संपादकीय काळजी आणि उपाय

सोबत दोन नकाशे आहेत, भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पावसाच्या प्रमाणांचे. कच्छ-सौराष्ट्र भागातच पाऊस सरासरीच्या जास्त झाला आहे. उत्तरप्रदेशाचा पश्चिम भाग, हरियाणा, दिल्ली या क्षेत्रांत पाऊस सरासरीच्या चाळीस टक्क्यांनाही पोचलेला नाही. ओरिसा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, केरळ व दक्षिण कर्नाटक या क्षेत्रांत पाऊस सामान्य आहे (म्हणजे सरासरीच्या १९% वरखाली). उत्तर कर्नाटक व तामिळनाडू मात्र सहाच दिवसांच्या पावसातल्या …

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे …

मंगळूर आणि ‘बायकीपणा’

तुमच्या मते स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या तशा स्थानाच्या तुलनेत कुठे असते? वर? खाली? बरोबरीत? उत्तर देताना घाई करू नये, कारण या एका प्रश्नाबाबत फारदा आपण स्वतःला फसवत असतो. उदाहरणार्थ, “मी माझ्या पत्नीला, मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अगदी बरोबरीने वागवतो.”, हे म्हणणारा पुरुष स्वतःला पत्नी, मुलगी, या स्त्रियांचा वर समजून त्यांना स्वातंत्र्य देत’ असतो. “हे मला …

पत्रचर्चा

रविन थत्ते, ४६, शिरीष, १८७, वीर सावरकर मार्ग, मुंबई ४०० ०१६. आसु (जाने. २००९, १९-१०) मध्ये किशोर वानखडे ह्यांनी आत्म्याचे नास्तित्व ह्यावर लिहिले आहे. माणूस मरतो तेव्हा आत्मा त्याला सोडून जातो ह्या तथाकथित कोठलाही वैज्ञानिक किंवा औपनिषदिक आधार नसलेल्या विधानावर ह्या पत्रात प्रहार करण्यात आले आहेत. मुळात जे सत्य नाही त्याला असत्य ठरवण्याचा हा प्रयत्न …

संपादकीय

मंदीची कहाणी The Grapes of Wrath आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन …

संपादकीय

एकोणीसशे पन्नास-साठच्या दशकात वादविवेचनमाला नावाची एक ग्रंथमाला काही घरांमध्ये दिसत असे. जॉर्ज बर्नार्ड शॉचे अॅन इंटेलिजंट वुमन्स गाईड टु कॅपिटॅलिझम, सोशलिझम एट् सेटरा (नेमके नाव जरा वेगळेही असेल!) हे पुस्तकही इंग्रजी वाचणाऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ओळखीचे असे. नंतर मात्र विनय हर्डीकरांच्या शब्दांत ‘सुमारांची सद्दी’ सुरू झाली. अभ्यास थांबला आणि अडाणी अतिसुलभीकरणे वापरात आली. कॅपिटॅलिझम म्हणजे मुक्त …

पत्रचर्चा –

घारपांडेना मिळालेल्या इंटरनेटवरील प्रतिक्रिया विकास देशपांडे, बोस्टन “परमसखा मृत्यू: किती आळवावा….” लेख वाचताना मला पटकन आठवले ते भा. रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: “नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते. कळे मला तू प्राणसखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि, तुजवाचून संसार फुका जरि… मन जवळ यावया गांगरतें”. शाळेत या …